ब्लॉग संग्रहण

गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०१०

शंभू तेथे अंबिका

महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण भारतभर अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्र उत्सव साजरा होतो. शक्ती उपासनेतून आपल्या संस्कृतीचा हा अमूल्य ठेवा आहे. अध्यात्म्य क्षेत्रात शक्ती शिवभक्तीचे  वर्णन केले जाते. शिव आणि शक्ती एकरूपतेने सर्वत्र व्यापली आहे.प्रकृती पुरुष म्हणूनही वर्णने आढळतात. शिवाची जशी अनेक रूपे आढळतात तशी शक्तीचेही अनेक रूपे आढळतात.
श्री संत ज्ञानेश्वर  महाराजांनी आपल्या 'भावार्थ दीपिकेत अनेक ठिकाणी सप्तशक्तीचे स्तवन केले आहे. कुठे गीतेला जगदंबा म्हटले आहे, असे रूपक करून जगदंबा मातेने जसे महिषासुराला ठार केले, तसे या गीतारूपी भगवतीने मोहरूपी महिषासुराला ठार करून आनंद निर्माण केला, असे म्हटले आहे कि
गीता हे सप्तशती |
मंत्र प्रतीपाद्य भगवती ||
मोहमहिशा  मुक्ती |
आनंदिली असे| |
राम्भासुरास महिशापासून झालेले महिषासुर याने घोर पुंच्चारण करून ब्रम्हदेवापासून 'पुरुष व्यक्तीपासून मला मरण नसावे' असा वर मिळविला. नंतर त्याने देवादिकांना अत्यंत त्रास दिला. तो सर्व प्राणीमात्रांना पिडा देऊ लागला. तेव्हा आदिशक्ती, अष्ट्याभुजा स्रीरूप धारण करून त्याच्याशी युद्धाला प्रवृत्त झाली.त्याने तिच्या रूपावर मोहित होऊन तिला वश करण्याचा प्रयत्न केला.आदिशक्तीने त्याचा वध  केला माया मोहरूपी राक्षस सामान्य माणसाला सुखाने जगू देत नाही. सत्य, न्याय, कर्म धर्मापासून दूर नेतो, अशा या दुष्ट्य महिषासुराचा नाश करण्याचे सामर्थ्य भगवदगीतेत आहे. ज्ञान, कर्म, भक्तिमार्गात आहे. म्हणून गीता भगवती माता आहे.महिषासुरमर्दिनी आई जगदंबा आहे. असा  समर्पक दाखला देऊन ज्ञानेश्वर त्या जगन्मातेला वंदन करतात.
जय जय वो शुद्धे | उदारे प्रसिद्ध्ये |
अनवरत आनंदे वर्षतिये ||
म्हणोनी आंबे श्रीमंते | निजजन कल्पलते |
अज्ञानी माते | ग्रंथानिरुपानी ||

आपल्या सदगुरूला  माउली मानून वर्णन करणारे ज्ञानेश्वर महाराज, त्या माउलीत आदिशक्ती जगदंबेचे रूप बघतात व नमन करतात. त्या मातेकडे ग्रंथनिरुपण सामर्थ्य मागताना म्हणतात.
 नवरसी भरावी सागरू |
करावी उचित रत्नांचे आगरु |
 भावार्थाचे गिरिवरु |
निफजवी माये |
 पाखांडाचे दरकुटे |
 मोडी वाग्वाद अव्हाते  |
 कुतर्काची दुष्टे सावजे फेडी || 
चंद्र तेथे चंद्रिका | शंभो तेथे अंबिका |
संत तेथे विवेक | असणे कि जी ||
जेथे जेथे संत असतात तेथे फक्त सद्विचारच आहे असे नसून तेथे विवेकही असतो चंद्र असेल तेथे चांदणे असायचेच, तसेच शंभू असेल तेथे आदिशक्ती अंबिका असणारच.
                                                                                                               
                                                                                                                                  नामदेव सदावर्ते 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा