ब्लॉग संग्रहण

बुधवार, १ ऑगस्ट, २०१२

स्मरण लोकमान्य टिळकांचे

लोकमान्य टिळक यांच्या विचारांचे स्मरण होणे ही आजची खरी गरज आहे. स्वातंत्रपूर्व काळात लोकमान्यांच्या विचारांनी तत्कालिन लोकांतील ' जी हुजुरी 'वृत्ती कमी करून स्वाभिमान, स्वातंत्रप्रेम व धैर्य उत्पन्न केले. आपण ससे, कोल्हे, कुत्रे नसून 'सिंह' आहोत ही जाणीव लोकां निर्माण झाली. सद्या लोकमान्य टिळकांचे विचार तरुण पिढीस मार्गदर्शक ठरतील. लोकमान्य टिळक त्यांच्या जीवनातील संकट काळात अचल, स्थितप्रज्ञ व कार्यतत्पर राहिले. गीतेचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. संकटातही त्यांचे चित्तस्थिर होते. आत्म विश्वास, धैर्य, मित्रवात्सल्य, साधेपणा, स्वार्थ त्याग, विरक्ती, विवेक राष्ट्रभिमान आदी गुण वैशिष्ट्ये असलेले लोकमान्यांचे चरित्र अद्वितीय आहे. राजकारण्यानीही टिळकांच्या जीवनाचा अभ्यास करावा. संत सांगतात- जाणत्याचे जाणावे प्रसंग |जाणत्याचे घ्यावे रंग | जाणत्याचे स्फूर्तीचे तरंग | अभ्यासावे || इंग्रजांनी काळ्यापाण्याची जबर शिक्षा सुनावून तुरुंगात प्रवेश होताच कागद- पेन्सिल घेऊन रातोरात अपिलाचे मुद्दे स्वताच बिनतोड लिहून सूर्योदय होताच सरकार दरबारी सादर करणारे लोकमान्य टिळक किती धैर्यवान व स्थिरचित्त असतील याची कल्पना येते. संत म्हणतात, चीत्तक्षोभाचे अवसरी | उचलूनि धैर्याने चांग करी | धृति म्हणिजे अवसरी | तियेते गा || टिळकांच्या विचारातून त्यांचे चतुरस्त्र व्यक्तिमत्व प्रकट होते. आजही हे विचार आत्मविश्वास निर्माण करणारे, आशावादी असून व्यक्ती, समाज संस्कृति व राष्ट्रहितासाठी प्रेरक आहेत. टिळक केसरीतील एका लेखात म्हणतात- " आपल्या थोर पूर्वजास विसरून जाऊन कोणतेही राष्ट्र उदयास आले नाही व येणार नाही. असा जो ऐतिहासिक सिद्धांत आहे, त्याचेच 'शिवजयंती उत्सव ' हे दृश्य स्वरूप आहे. स्वभाषेची अभिवृद्धी स्वराष्ट्राच्या इतिहासाचा स्वकीय दृष्टीने अभ्यास, मनन व स्वधर्मश्रद्धा इ. गोष्टी राष्ट्राच्या उत्कर्षाला कारणीभूत होतात.त्यासाठी शिवजयंती उत्सवासारख्या उत्सवांची गरज आहे. महाराष्ट्रातील निरनिराळ्या जातीचे प्रेम एकाच ठिकाणी बसण्यासारखे जर कोणते स्थळ असेल तर ते श्री शिवछत्रपतींचे चरित्र हेच होय. समान शस्त्रे, लोकांची पूर्ण मदत, डोंगर व किल्ले आणि जंगल यांचा पूर्ण पाठींबा, इतकी सिद्धता असल्यावर गामिनी काव्याने स्वराज्य स्थापित येते ही गोष्ट हिंदुस्थानच्या इतिहासात श्रीशिवाजी महाराज यांच्या प्रथम लक्षात आली. धैर्याने, उमेदीने, उत्साहाने, निष्काम कर्माने राष्ट्राला जे तेज येते त्याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजेच श्री शिवाजी महाराजांचे चरित्र होय. मार्गातील अनेक अडचणी बाजूला सारून जो पुढे पाऊल टाकतो त्यालाच यश मिळते. अलीकडच्या तीरावर बसून जो नुसता संकल्प करतो त्याला यश मिळणार नाही. भित्र्या माणसास ज्याप्रमाणे अंधारात भुते नाचलेली दिसतात त्याचप्रमाणे निरुद्योगी व निरुत्साही माणसाच्या वाटेत अडचणींचे डोंगर नेहमी उभे असायचेच."

गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०१०

शंभू तेथे अंबिका

महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण भारतभर अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्र उत्सव साजरा होतो. शक्ती उपासनेतून आपल्या संस्कृतीचा हा अमूल्य ठेवा आहे. अध्यात्म्य क्षेत्रात शक्ती शिवभक्तीचे  वर्णन केले जाते. शिव आणि शक्ती एकरूपतेने सर्वत्र व्यापली आहे.प्रकृती पुरुष म्हणूनही वर्णने आढळतात. शिवाची जशी अनेक रूपे आढळतात तशी शक्तीचेही अनेक रूपे आढळतात.
श्री संत ज्ञानेश्वर  महाराजांनी आपल्या 'भावार्थ दीपिकेत अनेक ठिकाणी सप्तशक्तीचे स्तवन केले आहे. कुठे गीतेला जगदंबा म्हटले आहे, असे रूपक करून जगदंबा मातेने जसे महिषासुराला ठार केले, तसे या गीतारूपी भगवतीने मोहरूपी महिषासुराला ठार करून आनंद निर्माण केला, असे म्हटले आहे कि
गीता हे सप्तशती |
मंत्र प्रतीपाद्य भगवती ||
मोहमहिशा  मुक्ती |
आनंदिली असे| |
राम्भासुरास महिशापासून झालेले महिषासुर याने घोर पुंच्चारण करून ब्रम्हदेवापासून 'पुरुष व्यक्तीपासून मला मरण नसावे' असा वर मिळविला. नंतर त्याने देवादिकांना अत्यंत त्रास दिला. तो सर्व प्राणीमात्रांना पिडा देऊ लागला. तेव्हा आदिशक्ती, अष्ट्याभुजा स्रीरूप धारण करून त्याच्याशी युद्धाला प्रवृत्त झाली.त्याने तिच्या रूपावर मोहित होऊन तिला वश करण्याचा प्रयत्न केला.आदिशक्तीने त्याचा वध  केला माया मोहरूपी राक्षस सामान्य माणसाला सुखाने जगू देत नाही. सत्य, न्याय, कर्म धर्मापासून दूर नेतो, अशा या दुष्ट्य महिषासुराचा नाश करण्याचे सामर्थ्य भगवदगीतेत आहे. ज्ञान, कर्म, भक्तिमार्गात आहे. म्हणून गीता भगवती माता आहे.महिषासुरमर्दिनी आई जगदंबा आहे. असा  समर्पक दाखला देऊन ज्ञानेश्वर त्या जगन्मातेला वंदन करतात.
जय जय वो शुद्धे | उदारे प्रसिद्ध्ये |
अनवरत आनंदे वर्षतिये ||
म्हणोनी आंबे श्रीमंते | निजजन कल्पलते |
अज्ञानी माते | ग्रंथानिरुपानी ||

आपल्या सदगुरूला  माउली मानून वर्णन करणारे ज्ञानेश्वर महाराज, त्या माउलीत आदिशक्ती जगदंबेचे रूप बघतात व नमन करतात. त्या मातेकडे ग्रंथनिरुपण सामर्थ्य मागताना म्हणतात.
 नवरसी भरावी सागरू |
करावी उचित रत्नांचे आगरु |
 भावार्थाचे गिरिवरु |
निफजवी माये |
 पाखांडाचे दरकुटे |
 मोडी वाग्वाद अव्हाते  |
 कुतर्काची दुष्टे सावजे फेडी || 
चंद्र तेथे चंद्रिका | शंभो तेथे अंबिका |
संत तेथे विवेक | असणे कि जी ||
जेथे जेथे संत असतात तेथे फक्त सद्विचारच आहे असे नसून तेथे विवेकही असतो चंद्र असेल तेथे चांदणे असायचेच, तसेच शंभू असेल तेथे आदिशक्ती अंबिका असणारच.
                                                                                                               
                                                                                                                                  नामदेव सदावर्ते 

शुक्रवार, १० सप्टेंबर, २०१०

या . . . गणराया ! . . . या !

या मंगलमुर्ती गणराया ! या ! महाराष्ट्रातील भोळ्या भाविक भक्तांसाठी आपण दरवर्षी कैलासाहून पृथ्वीवर येत असता तसेच या वर्षीही आपण आलात !  महाराष्ट्रासह हिंदुस्थानातील करोडो भक्त आपले आनंदाने भक्ती भावाने जल्लोषाने स्वागत करीत आहेत.
पण हे देवा गणराया! काय शोधीत आहात आपण? समाजप्रबोधन करणाऱ्या व्यासंगी विद्वानांची व्याख्यानमाला, परिसंवाद, कीर्तने- पारायणे, प्रवचने आदी धार्मिक कार्यक्रम आपणास पहावयास मिळतील. या आशेने आपली सूक्ष्म व शोधक नजर भिरभिरताना दिसते. शंभर वर्षांपूर्वीची ती तुमच्या उत्सवाची पवित्र परंपरा नष्ट झाली. याचे दु:ख तुम्हाला होत असते. तरीही तुम्ही दरवर्षी येत ते कशासाठी? भक्तांची होत असलेली अधोगती केवळ अज्ञानामुळे होताना दिसते. 
आपण तर बुद्धीदाते आहात. आपल्या भक्तांना बुद्धीसंपन्न  होण्याची प्रेरणा द्या! पूर्वीप्रमाणेच तरुणपिढी स्वाभिमानी , कष्टाळूनिर्भय तेजस्वीविचारी धनसंपन्न आणि धार्मिक असावी असे आपणास वाटते ना पण पहा तुमच्या मिरवणुकीत 'डीजे'च्या बेसूर कर्कश आवाजात धुंद-मद्यधुंद होऊन  नाचणारी तरुण मुले-मुलीराजकारण्यांनी दिलेल्या वर्गणीच्या प्रचंड पैशांनी बेफाम झालेलीहरी तरुणपिढी पाहून अपार चिंताक्रांत नजरेने पाहता ना ! शंभर वर्षात झालेल्या या अधोगतीमुळे तुम्हाला क्लेश होतांना दिसतात
देवातू विघ्नहर आहेसयेथे येऊन  भक्तांची दुर्दशा तू पाहतो आहेस ना ! अतिरेक्यांच्या दहशतवादी कारवाया , प्रचंड महागाईनिसर्गाचा कोपशिवाय सार्वजनिक क्षेत्रात बोकाळलेला भ्रष्टाचार यामुळे त्रस्त झालेली जनता पाहून हे गणराया तुला खूप दु:  होत आहे ना !
गणराया तुम्ही आमच्या भेटीसाठी येता आणि आम्ही रस्त्यांवर अडथळ्याचा विचार  करता मंडप उभारतोवीज चोरी करून रात्री रोषणाई करतोउत्सवाचे उत्पन्न वाढावे म्हणून रात्री 'जुगारखेळतोनगरसेवकराजकारणी नेतेयांच्याकडून गुप्तदान आणतोहे गुणराया तुला  आवडणारे सर्व गाणे रेकॉर्डवर लावतोतुमहाला जे आवडणार नाही ते तुमच्यासमोर आम्ही करतो हे सारे गणराया तुम्ही निर्विकारपणे पाहतायेथे येण्यापेक्षा येथून परत जातांना तुम्ही अधिक आनंदात असता.
हे गणराया लोकशाहीची विटंबना सर्वत्र आढळतेते ज्ञानसंपन्न  कार्यकर्तेकलाकारव्याख्याते पुन्हा उत्सवात दिसतील अशी बुद्धी देकेवळ उत्सवाच्या  नावावर प्रचंड संपत्ती गोळा करूनअनाठायी खर्च  अपहार करणारे गुंडप्रवृत्तीचे लोकच तुला सर्वत्र आढळतील. आरतीनंतर नेत्याचाच जयजयकार होतो. हे गणरायाअसुरक्षित नेतेपूरग्रस्तव्यसनग्रस्त व भयभीत झालेली जनता पाहून तुला होणारे दु:ख कोण समजून घेईलती पहा.....वैयक्तिक स्वार्थासाठी लाचारी प्रकट करीत सत्ताधाऱ्यापुढे हात जोडून वाकून टोळीदारूगर्दअफूगांजा यासारख्या व्यसनांच्या आहारी जावून मृत्युच्या दारात उभी असलेली बेरोजगार तरुणांची गर्दी! 
तत्वनिष्ठकर्तव्यप्रेम सोडून सत्तेपुढे मुजरा करणारे लाचार सरकारी कर्मचारीशिक्षकपोलीस सर्वत्र दिसतात आणि ते पहा....हे गणराया तुझ्या उत्सवात आपली राजकीय पोळी भाजू पाहणारे राजकारणी!! महागाई विसरून भक्त राजकीय नेत्याला मान देतो.
हे देवाआंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धा असो कि मराठी साहित्यसंमेलने दोन्हींकडे पैशांचा अपहार उघड झाल्याची वार्ता तुम्हाला ऐकावयास मिळाली नाशिक्षण क्षेत्र तर भ्रष्टाचाराचे कुरणच झाले आहे. शाळेत बालकांना पोषण आहार देण्यासाठी प्रचंड अनुदान दिले जातेत्यातही 'भ्रष्टाचाराची खिचडी'शिजत आहे ना ?हे गणरायातू सर्वज्ञानी आहेससूक्ष्म डोळ्यांनी तू हे सर्व पहाशीलच पण लोक आम्हाला निगेटिव  माइन्डचे  म्हणतील कारण आता भ्रष्टाचारात सामील होणे यालाच 'सकारात्मक विचारसरणीम्हणतात. देवा तूच बुद्धी व सामर्थ्य देशील तर भविष्यात परिवर्तन घडेल. 'पसायदानप्रत्यक्ष साकारेल! अन्यथा.....सक्तीची वर्गणी व भ्रष्टाचाऱ्यानी दिलेल्या गुप्तदानाच्या जोरावर चालणारे तुझे 'उत्सवकेवळ मौजमजा व मद्यधुंद  जेवनावल्या ठरतील ! मराठी अस्मिता जपण्यासाठी भाषाभिमान निर्माण होणार नाही हे 'मराठीमनालाकळू दे. गणरायाआला आहात तर देशमहाराष्ट्र व मराठी संस्कृती वाचविण्यासाठी भक्तांना बळ द्या.
                                                                                                                                                         नामदेव सदावर्ते